Saturday, 30 October 2021

शिक्षकांना दिवाळी पूर्वी पगार द्या -जिल्हा कार्याध्यक्ष किशोर डोंगरे


 कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक भारती संघटनेचे शालार्थ आय.डी. त्वरित देण्यासाठी पुणे विभागीय शिक्षण मंडळ पुणे येथील अध्यक्ष  तुकाराम सुपे यांना निवेदन देण्यात आले. 

पुणे विभागातील 20% शिक्षकांचा शालार्थ आय.डी. अभावी पगार बंद आहे त्यांची दिवाळी गोड करण्यासाठी ऑनलाईन  किंवा  ऑफलाईन पगार त्वरित सुरू करा या मागणीसाठी अहमदनगर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक भारती संघटनेचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक पुणे विभागीय शिक्षण मंडळ पुणे येथील अध्यक्ष तुकाराम सुपे यांना अहमदनगर कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक भारती संघटनेचे कार्याध्यक्ष डॉ. किशोर डोंगरे व सरचिटणीस महेश पाडेकर यांनी निवेदन दिले

   महाराष्ट्र राज्यातील अनेक विनाअनुदानित शिक्षकांना जीवनातील एक आशेचा किरण म्हणजे 15 नोव्हेंबर 2020 रोजी शासन निर्णय निघाला की अनेक शिक्षकांना एकूण पगार पैकी 20 टक्के पगार विनाअनुदानित शिक्षकांना चालू होणार 1 नोव्हेंबर 2020 पासून शासनाने तो देण्यास सांगितला पण शिक्षण विभागातील अनेक अधिकाऱ्यांनी तो अनेक शिक्षकांना शालार्थ आयडी अभावी दिलाच नाही महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे संचालक यांच्या पत्रानुसार काही दिवस ऑफलाइन पगार दिले त्या कालावधीत शिक्षण मंडळाने तो सर्व शिक्षकांचा शालार्थ आयडी काढणे अपेक्षित होते परंतु अद्यापही काही शिक्षकांचे पगार बंद असून तो शिक्षण उपसंचालक कार्यालय पुणे या ठिकाणी पडून आहे त्यामुळेच अनेक  शिक्षकांच्या तक्रारी संघटनेकडे प्राप्त झाले आहेत शालार्थ आयडी त्वरित शिक्षकांना द्या अन्यथा 20% शिक्षकांच्या पगारासाठी आंदोलन करावे लागेल असे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष किशोर डोंगरे व महेश पाडेकर यांनी सांगितले तसेच माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणी च्या प्रशिक्षणाचे त्वरित आयोजन करावे इयत्ता 10 वी 12 वी बोर्डाची फेब्रुवारी मार्चमध्ये होणाऱ्या परीक्षेचे स्वरूप मूल्यमापन व वेळापत्रका संदर्भात मार्गदर्शन करावे तसेच परीक्षेसाठी कपात केलेला अभ्यासक्रम मुद्देनिहाय  न करता धडे निहाय कमी करून विद्यार्थ्यांचा मानसिक त्रास कमी करावा या अनेक मागण्यांसाठी शिक्षक भारतीय संघटनेचे निवेदन देण्यात आले या मागणीसाठी

राज्य सचिव सुनील गाडगे माध्यमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप सचिव विजय कराळे माध्यमिक सोसायटीचे संचालक कैलास राहणे, विनाअनुदान विरोधी समितीच्या महिला राज्याध्यक्ष रूपाली कुरुमकर,उच्च माध्यमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र आरु उपजिल्हाध्यक्ष रामराव काळे सचिन जासूद प्रसिद्धीप्रमुख अमोल चंदनशिवे संदीप वर्पे, मफीज इनामदार ,सचिन लगड,महिला तालुकाध्यक्ष, रूपाली बोरुडे ,  संजय तमनर, श्याम जगताप ,हर्षल खंडीझोड ,दिनेश शेळके प्रवीण मते, गोवर्धन रोडे,संजय भुसारी ,संभाजी पवार,संजय पवार, सोमनाथ बोनंतले, आदी मान्यवरांनी पाठिंबा दिला.


जॉन सोनवणे,बाळासाहेब शिंदे,

रेवन घंगाळे,प्रशांत कुलकर्णी,

एम पी शिर्के,हनुमंत बोरुडे,सोमनाथ बोंतले,प्रकाश मिंड,मधुकर नागवडे,महादेव कोठारे,संतोष देशमुख,योगेश कराळे, महिला जिल्हाध्यक्ष, आशा मगर,विभावरी रोकडे,मीनाक्षी सूर्यवंशी, शकुंतला वाळुंज,छाया लष्करे,

काशीनाथ मते

सर्व जिल्हा तालुका पदाधिकारी शिक्षक भारती संघटना अहमदनगर आदींनी पाठिंबा दिला

No comments:

Post a Comment

शिक्षक, सरकारी कर्मचाऱ्याचा मुलगा,मुलगी ओबीसी आरक्षणाचा लाभ घेऊ शकतो.

 देशात ‘मंडल आयोग’ लागू झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ‘नॉन-क्रिमिलेअर’ लागू करण्याचा निर्णय घेतला. यासाठी ‘डीओपीटी’ने ओबीसींमधील सधन व्यक्...